Tuesday, April 23, 2024

नगरमध्ये तोतया महिला उभी करून जमिनीची परस्पर विक्री…९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे तयार करून व तोतया महिलेचा वापर करून, नगर शहराजवळील, बुऱ्हाणनगर (ता. नगर) शिवारातील १० गुंठे शेत जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी ९ जणांविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात काल, सोमवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललिता माणिकराव कादबने (६७, रा. कलानगर, गुलमोहर रस्ता, सावेडी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत बाळू शिंदे (रा. तिसगाव, पाथर्डी), साठेखत दस्त व जनरल मुखत्यारपत्र दस्तात उभी राहिलेली तोतया महिला (नाव, पत्ता माहिती नाही), ज्ञानेश्वर साहेबराव बोरसे (रा. बुरूडगाव, नगर), भारत आण्णा शिंदे (रा. सावेडी), योगेश जगदीश सगळगिळे (रा. कोठी, स्टेशन रस्ता), अमर देविदास बोरा (रा. तपोवन रस्ता, तपोवन हाडको, सावेडी), संदीप आनंदा थोरात (रा. कल्पतरू हौसिंग सोसायटी, सावेडी, नगर), विठ्ठल शंकर उमाप (रा. सावेडी) व अंबादास रतन नवगिरे (रा. सांगवी बुद्रुक, ता. पाथर्डी, सध्या रा. ममता गॅस एजन्सीशेजारी, गुलमोहर रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

श्रीमती ललिता कादबने यांची सर्व्हे क्रमांक ६५/२ मध्ये १० गुंठे शेतजमीन होती. या जमिनीची परस्पर विक्री करण्यासाठी एका तोतया महिलेने तिचे बनावट आधार कार्ड तयार केले व तिच फिर्यादीच्या जमिनीची मालक असल्याचे दाखविले. प्रशांत बाळू शिंदे व इतरांनी तोतया महिलेचा वापर करून फिर्यादीच्या जमिनीचे प्रथम रजिस्टर साठेखत तयार केले व लगेच त्याआधारे बनावट मुखत्यारपत्र केले. त्या जनरल मुखत्यारपत्राचे आधारे सह दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदीखत करून घेतले. श्रीमती कादबने यांची १० गुंठे शेतजमीन नोंदणीकृत दस्ताने परस्पर विक्री करून त्यांची फसवणूक केली.

दरम्यान ललिता कादबने व त्यांचे पती जूनमध्ये तलाठी कार्यालय येथे शेतजमिनीचा कर भरण्यासाठी गेले असता त्यांनी जमिनीचा सातबारा पाहिला, त्यावर कादबने यांच्या नावावरील जमिनीची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला. त्याची तक्रार अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles