Saturday, December 7, 2024

कर्डिलेंच्या निवासस्थानी रंगला हळदीकुंकु कार्यक्रम, मतदारसंघातील हजारो महिलांची उपस्थिती

नगर : गावखेड्यातील महिला आज नव्या युगात नवी वाटचाल करीत आहे, राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रासोबतच कुटुंबाची जबाबदारी अनेक महिला यशस्वीपणे पार पाडत आहे, या महिलांच्या सन्मानाला बळ देत जाणीव जागृतीसाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी नगर जिल्ह्यातील आणि विशेषतः राहुरी, पाथर्डी, नगर, तालुक्यातील वाड्यावस्त्यावरील महिलांसाठी हळदीकुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी जिल्हाभरातील २५ हजार महिलांनी उपस्थिती दर्शवत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला,
बुऱ्हाणनगर येथे महिला सन्मानासाठी मा. मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या निवासस्थानी मकर संक्रांतनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी अलका कर्डीले व प्रियांका कर्डीले यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावत वाण भेट दिले,
यावेळी बोलताना अलका कर्डीले म्हणाल्या की, मकर संक्रात हा सण भारतीय संस्कृतीमध्ये महिलांसाठी एक पर्वणी म्हणून ओळखला जातो, म्हणून महिला वर्गात मकर संक्राती सणाला विशेष महत्त्व आहे, हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृतीचे जतन होण्याचे काम केले जात असते. तसेच एकत्रित जमलेल्या महिलांच्या विचारांची देवाणघेवाण देखील होत असते एकमेकांशी असलेली कटुता विसरून गोडी निर्माण व्हावी यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे त्यांनी सांगितले
यावेळी बोलताना प्रियांका कर्डीले म्हणाल्या की, कर्डीले परिवाराचे नागरिकांशी असलेल्या संवादामुळे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. प्रभागातील महिलांना दिलेल्या सार्थ विश्वासामुळे एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या आहे, या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमातून स्नेहबंध निर्माण होत असतो, आपली परंपरा संस्कृती जोपासण्यासाठी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन केले आणि यातून एक प्रकारे आपल्या सर्वांमध्ये गोडवा निर्माण झाला आहे असे त्यांनी सांगितले.
बुऱ्हाणनगर येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या निवासस्थानी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत महिलांनी तोबा गर्दी केली होती, हि गर्दी म्हणजे कर्डीले कुटुंबियांच्या सामाजिक व राजकीय कार्यातील आत्तापर्यंतच्या गर्दीचा उच्चांक ठरला आहे, या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता, यावेळी उखाणे, गवळणी, नृत्य सादर करत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला, तर या सांस्कृतिक कार्यक्रमात धनश्री सुजय विखे यांनी देखील महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला, पारंपरिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महिलांसाठी मेजवानीच ठरली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles