श्रीरामपूर-शहरातील एका फुड कॅफेमध्ये अश्लिल चाळे करणार्या तीन युवक व तीन युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले. महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरातील बोरावके महाविद्यालयामागील रेल्वे लाईनच्या बाजूस असलेल्या समृध्दी फुड कॅफेमध्ये कॉलेज युवक युवती अश्लिल चाळे करीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली होती. या माहितीवरुन त्यांनी पोलिसांचे पथक नेमून त्याठिकाणी छापा टाकून कारवाईचे आदेश या पथकास दिले होते.
त्यानुसार पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड, रघुवीर कारखिले, राहुल नरवडे, गौतम लगड, सतिश खरात, रमिजराजा आताप, श्री. माळी, चालक श्री. गिरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता निकम-गुंजाळ, मिरा सरद यांनी समृध्दी फुड कॅफेवर छापा टाकला असता त्याठिकाणी तीन युवक व तीन युवती अश्लिल चाळे करताना आढळून आले.
पथकाने त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले. या सदरच्या युवक-युवतींवर प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी कॅफे चालक रोहित आबा शिंदे (वय 22, रा. श्रीरामपूर) याच्याविरुध्द मुंबई पोलीस अॅक्ट 110, 112 प्रमाणे कारवाई केली आहे.