Monday, April 22, 2024

सनदी लेखापालांसमोर आ.संग्राम जगताप यांनी इंग्रजी भाषण करीत मांडले विकासाचे व्हिजन

चाणक्य चौकातील सीए स्क्वेअर शिल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न

शहर सौंदर्यकरणातून पर्यटन क्षेत्राला चालना – आमदार संग्राम जगताप

नगर – आपल्या शहराला महान इतिहास लाभला आहे याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी शहर विकासाच्या कामाबरोबरच सौंदर्यकरणावर भर दिला आहे, नगरकर पुढे येत असून सीए अहमदनगर शाखेने पुढाकार घेत चाणक्य चौकामध्ये सीए स्केअर शिल्प उभारले आहे, या कलाकृतीच्या माध्यमातून त्याची संकल्पना समाजासमोर येत असते, सीए चे महत्त्व समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून आर्थिक नेतृत्वाची झेप ते घेत असतात सौंदर्यकरणातून पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील होईल सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येकाने शहरासाठी आपले कर्तव्य बजवावेत, सीए अहमदनगर शाखेने पुढाकार घेत नगरकरांना शिल्पाच्या माध्यमातून प्रेरणा व ऊर्जा निर्माण होईल असा संदेश देण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
चाणक्य चौक येथे अहमदनगर महानगरपालिका व अहमदनगर सीए शाखेच्या वतीने सीए स्क्वेअर शिल्पाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, सीए इन्स्टिट्यूटचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष अर्पित काबरा, सीए इन्स्टिट्यूटचे पश्चिम विभागाचे खजिनदार सी ए केतन सिया, अहमदनगर सीए शाखेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मनपा महिला बालकल्याण समिती मा.उपसभापती मीना चोपडा, प्रा माणिकराव विधाते, सीए मोहन बरमेचा, माजी नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र गांधी, ज्ञानेश कुलकर्णी, सीए सुनित मुथा, वैभव ढाकणे, ऋषी ताठे, शिल्पकार विकास कांबळे, इंजि. रितेश कांकरिया, विनोद साळे, सी ए अहमदनगर शाखेचे सचिव प्रसाद पुराणिक, खजिनदार अभय कटारिया, सदस्य महेश तिवारी, मिलिंद जांगडा, किरण भंडारी, सुशील जैन, संजय देशमुख, प्रसाद भंडारी, बापू कुलट, नवनाथ वाघ,आदिंसह सीए बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, नगर शहर विकास कामातून बदलत असून याचे सर्व श्रेय आमदार संग्राम जगताप यांना जाते. नगर शहरामध्ये पहिला म्युजिकल फाउंटन उभा राहिला असून नगरकरही मोठ्या संख्येने पाहण्यासाठी येत असून त्याचा आनंद घेत आहे. लवकरच आयटीआय गेट परिसराचे व तरुण सागर महाराज यांच्या उद्यानाचे देखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सीए शाखेने पुढाकार घेऊन चाणक्य चौकाच्या सौंदर्यकरणात भर घालण्याचे काम केले आहे असे ते म्हणाले.
सीए शाखेचे अध्यक्ष राजेंद्र काळे म्हणाले की, सीए असोसिएशनला 75 वर्ष पूर्ण झाले असून देशाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. अहमदनगर शहर शाखेच्या वतीने सीए स्क्वेअर हे शिल्प उभे केले असून या कामासाठी आमदार संग्राम जगताप व माजी उपमहापौर गणेश भोसले यांचे सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासात योगदान देण्याची संधी आम्हाला मिळाली आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन सीए शाखेचे उपाध्यक्ष सनित मुथा यांनी मानले

चाणक्य चौकात उभारलेल्या सीए शिल्पाची माहिती देत ज्ञानेश कुलकर्णी यांनी सांगितले की, गरुड पक्षी हा सीए असोसिएशनचा सिम्बॉल असून हा मार्ग व दिशा देणार आहे. यातून प्रकाश देणारी व्यक्ती म्हणजे सीए होय. गरुड हा ध्येयवादी पक्षी असून सीए बांधवांमध्ये देखील शक्तिशाली दृष्टी असली पाहिजे. गरुडाप्रमाणे सीए कडून आर्थिक नेतृत्वाची झेप घेत बुद्धिमत्तेच्या जोरावर जगामध्ये अग्रेसर राहील असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे असे ते म्हणाले.


आ. संग्राम जगताप यांचे इंग्रजीतून भाषण –
सीए स्क्वेअर शिल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप भाषण करीत असताना इंग्रजीतून बोलायला सुरू केले. यावेळी श्रोत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त करीत त्यांना साथ दिली व शहराच्या विकासाचे नियोजन व व्हिजन यावर ते बोलत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles