Saturday, October 12, 2024

नगर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाला दिली नाही तर….बैठकीत एकमताने असा झाला ठराव

“नगर विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी”नगरच्या भाजपाच्या बैठकीत एकमताने ठराव. भाजपाला शहर विधानसभेची जागा दिली नाही तर महायुतीला निवडणुकीत यश मिळणार नाही-वसंत लोढा
नगर-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडी साजन मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीची व्यापक बैठक संपन्न झाली.या बैठकीत महापालिकेची झालेली बिकट अवस्था तसेच नगर शहरातील दहशतवाद गुंडगिरी
या बैठकीत “नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला मिळावी” हा ठराव भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केला या ठरावाला सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिले.याप्रसंगी भाजपा प्रदेशचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते वसंत लोढा, विधानसभा प्रमुख भैया गंधे,ज्येष्ठ नेते मधुसूदन मुळे,सुनील रामदासी,माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दामोदर भटेजा,अच्युतराव पिंगळे,सरचिटणीस सचिन पारखे,प्रशांत मुथा,पंडित वाघमारे,अनिल मोहिते, महेश नामदे,ओबीसी मोर्चा चे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,महिला अध्यक्षा प्रियाताई जानवे,गीता गिल्डा,सुरेखा विद्ये,सविता कोटा, बाबासाहेब सानप,राजेंद्र सातपुते,राहुल जामगावकर, युवकचे जिल्हा अध्यक्ष मयूर बोचुघोळ,अनिल सबलोक, कालिंदी केसकर,साहेबराव विधाते,सचिन कुसळकर,डॉ.अजित फुंदे,राजेंद्र काळे,ज्ञानेश्वर काळे,गोपाल वर्मा नरेंद्र कुलकर्णी,गोकुळ काळे, बाबासाहेब सानप, कुंडलिक गदादे,ज्योती दांडगे, रेखा विधाते,सौ रेखा मैड,राजेंद्र मंगलारप,बंटी डापसे, रोहित पठारे अनिल निकम,बाळासाहेब खराडे,सुनील सकट,नरेश चव्हाण आदी उपस्थित होते.
अभय आगरकर म्हणाले,गेल्या 35 वर्षापासून नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला मिळालेली नाही.नगर शहर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांचे मन जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यापक बैठक बोलवण्यात आली.या बैठकीत सर्वांनी मनमोकळेपणाने नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला मिळावी असे बोलून दाखविले.यामुळे “नगर शहराची विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला देण्यात यावी” असा ठराव करण्यात येत आहे.
वसंत लोढा म्हणाले,शहर विधानसभेची जागा भाजपाला दिली नाही तर महायुतीला निवडणुकीत यश मिळणार नाही.भारतीय जनता पार्टीला नगरसेवक, नगराध्यक्ष,महापौर व उपमहापौर ही पदे मिळाली आहेत.परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आजपर्यंत नगर शहरात आमदार होण्याची संधी मिळाली नाही.नगर शहरात भारतीय जनता पार्टीला मानणारा एक मोठा वर्ग आहे.भारतीय जनता पार्टीने दहशतवाद,शहरातील अवैध धंदे,ताबेमारी,गुंडगिरी या विरोधात नेहमीच आवाज उठून नगरच्या जनतेला न्याय मिळवून दिला आहे.त्यामुळे नगर शहरातील जनता नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहिली आहे.भारतीय जनता पार्टीला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे.यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अशी मागणी करीत आहेत.नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला द्यावी अथवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपाला परवानगी द्यावी. भैय्या गंधे म्हणाले,नगर जिल्ह्यात दक्षिणेत भाजपाचे खासदार चार वेळा निवडून आले आहेत.हे सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच शक्य झाले आहे. शहरात ही आज हीच परिस्थिती आहे.नगरची जनता व मतदार भारतीय जनता पार्टीच्या बाजूने ठाम उभा आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नगर शहराची विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी याची मी मागणी केली आहे. उमेदवारी कोणालाही मिळो आपण सर्वजण त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले,शहराची विधानसभेची जागा भाजपाला मिळावी यासाठी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी एकत्र आले आहेत.आपापसातील हेवेदावे विसरून एकमताने विधानसभेला सामोरे जाऊ.उमेदवारी कोणालाही मिळो सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे. सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले. तर आभार प्रशांत मुथा यांनी मानले.या बैठकीसाठी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles