Sunday, July 14, 2024

Ahmednagar news:चोर असल्याच्या संशय ,परप्रांतीय व्यक्तीला झाडाला बांधून अमानुष मारहाण

अहमदनगर-सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून व लटकावून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (25 जून) सायंकाळी घडली असून बुधवारी (26 जून) व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हा प्रकार समोर आला. राजू हिरा घोष (वय 32, रा. शंकरकला, जि. मालदा, राज्य पश्चिम बंगाल) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार पांडुरंग आश्रुबा बारगजे यांनी फिर्याद दिली आहे. किरण भगवान औसरकर, बाबासाहेब भगवान पुंड, विशाल किसन इवळे, ऋषिकेश आजिनाथ जायभाय, ऋतिक बाबासाहेब पुंड (सर्व रा. औसरकर मळा, सारसनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यातील बाबासाहेब पुंड वगळता चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घोष हा चोर असल्याच्या संशयावरून मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. त्याला झाडाला बांधून व लटकावून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.
जखमी घोष याची प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. अटकेतील चारही संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मारहाण करताना वापरलेले हत्यार, दोरी हस्तगत करायची आहे, आणखी कुणाचा सहभाग आहे याची चौकशी करायची आहे, त्यासाठी सात दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकार्‍यांनी केली. न्यायालयाने चौघांना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles