Sunday, September 15, 2024

नगरमधील ‘तो’ युवक निघाला होता पॅलेस्टाईनला,एका फोनमुळेच तो पोलिसांच्या अडकला जाळ्यात

नगर – -घरात कोणालाही न सांगता एक २० वर्षीय युवक २ ऑगस्टपासून बेपत्ता झाला होता. त्याचा पोलीस त्याचे नातेवाईक शोध घेत होते. दरम्यान त्याने इंस्टाग्रामवरून त्याच्या एका मित्राला फोन करून आपण पॅलेस्टाईनला जात असून, तू देखील चल असे सांगत त्याला मुंबईला बोलावले.त्याच्या या एका फोनमुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दरम्यान, सदर युवकाचा जबाब घेऊन त्याला पुढील चौकशीसाठी गुप्तचर विभाग व दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर शहरातील उपनगर परिसरातील एक २० वर्षीय युवक २ ऑगस्टपासून घरात कोणालाच काही न सांगता बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार तोफखाना पोलिसात दिली होती.पोलीस व त्याचे नातेवाईक व मित्रांकडे त्याची चौकशी करत होते. यादरम्यान त्याच्या एका मित्राला त्याने इंस्टाग्रामवरून फोन करून मुंबईला बोलावले. मी तिकडे जाणार आहे, तू मुंबईत ये, येथे तुला काम मिळवून देतो, असे त्याने मित्राला सांगितले.

मित्राने तत्काळ त्याच्या वडिलांशी संपर्क साधला व त्यांना ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना देखील कळवण्यात आले. नातेवाईकांनी मुंबईत जाऊन त्याला ताब्यात घेतले व नगरला आणले.दरम्यान तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला खरोखरच पॅलेस्टाईनला जायचे होते का, कशासाठी जायचे होते, त्यासाठी त्याचे मन कोणी वळवले, याचा तपास केला जात आहे.सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. दरम्यान, नगर शहरातून बेपत्ता झालेल्या एका युवकाला ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles