अहमदनगर शहरातील सक्कर चौकात शुक्रवारी (३० ऑगस्ट) दोन गटातील १० ते १२ व्यक्तींनी चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यात आडवी उभी करून आपसात हाणामारी केली होती.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले होते.परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वाद झालेल्या दोन्ही गटांत मागील अनेक वर्षांपासून कुरबुरी सुरू होत्या.
यातून हा प्रकार झाल्याचे बोलले जाते. शुक्रवारी सायंकाळी उशिरा कोतवाली पोलिस
ठाण्यात अज्ञात दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस फिर्यादीनुसार, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याआदेशाने पोलिस उपनिरीक्षक महेशशिंदे हे पोलिस सहकाऱ्यांसह घटनेच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी दोन गटातील १०-१२ व्यक्ती चारचाकी, दुचाकी वाहने सक्कर चौकात रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने उभी करून आपसात मारामारी करताना दिसले. त्यांना पकडण्याकरिता जात असताना पोलिसांच्या वाहनाची
चाहूल लागताच मारामारी करणारे व्यक्ती पळून गेले.पोलिसांनी जमलेल्या गर्दीतील लोकांकडे विचारपूस केली,
परंतु उपयुक्त माहिती मिळून आली
नाही.त्यामुळे अज्ञात व्यक्तींविरोधात शांततेस बाधा निर्माण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४(२), २८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल मगडे करीत आहेत.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे, अंकुश बेरड, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सत्यजित शिंदे, सचिन लोळगे, सूरज
दिलीप कदम यांनी केली आहे.