Friday, December 1, 2023

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सराईत गुन्हेगार गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह ताब्यात…

गणेश उत्सवाचे पुर्वसंध्येला शनिशिंगणापुर येथुन स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारास घेतले ताब्यात. 02 गावठी कट्टे व 02 जिवंत काडतुसे जप्त
राकेश ओला , पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना आगामी सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक 18/09/2023 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे शाहरुख शेख रा. घोडेगांव, ता. नेवासा हा त्याचे कब्जात विनापरवाना बेकायदेशीर रित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुस बाळगुन त्याची विक्री करण्याकरीता शनिशिंगणापुर येथे येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/धाकराव, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डिले, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे व चालक पोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक कारवाई कामी नेमले होते.
पथकाने माहिती काढुन शनिशिंगणापुर ते कांगोणी फाटा कडे जाणारे रोडवरील शनिसाई रसवंती गृह शनिशिंगणापुर या ठिकाणी सापळा लावुन त्या ठिकाणी एक संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख वय 23 वर्षे, रा. घोडेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 60,000/- रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे कट्टे (अग्निशस्त्रे) व 1000/- रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे मिळुन आले. त्याबाबत त्यांचेकडे विचारपुस करता त्याने सदरचे 02 गावठी कट्टे व 02 जिवंत काडतुस विक्री करण्याकरीता आणले असल्याची कबुली दिली आहे.
इसम नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख रा. घोडेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर हा वरीलप्रमाणे 02 गावठी कट्टे व 02 जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोना/185 ज्ञानेश्वर नामदेव शिंदे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर शनि शिंगणापुर येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 179/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही शनि शिंगणापुर पोस्टे करीत आहे.

आरोपी नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये मारहाण, विनभंग, दरोड्याची तयारी, घातक हत्यारे बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे या सारखे गंभीर
स्वरुपाचे शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे एकुण 13 गुन्हे दाखल आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, श्री सुनिल पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव उपविभाग शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: