Tuesday, June 25, 2024

Ahmednagar crime : सावेडी उपनगरात युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार

अहमदनगर-मागील भांडणाचा राग मनात धरून युवकावर कोयता व रॉडने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील सुखकर्ता कॉर्नरवर घडली. करण अशोक दाहिजे (वय 20 रा. गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.करण बुधवारी दुपारी भिस्तबाग येथून ड्रायक्लीनचे कपडे घेऊन दुचाकीवरून पाईपलाईन रस्त्याने जात असताना दुपारी एकच्या सुमारास सुखकर्ता कॉर्नरजवळ त्यांना तीन दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी अडवले. करण तनपुरे याच्या हातात कोयता, सातव व अर्जुन तनपुरे यांच्या हातात लोखंडी रॉड व दोन ते तीन अनोळखी व्यक्तींकडे लाकडी दांडके होते. त्यांनी करणला मारहाण करून जखमी केले. भांडण सुरू असताना रस्त्यावरील लोक जमा झाल्याने मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी यश सातव याने दारू पिऊन सायंकाळी साडेआठच्या सुमारास करणला शिवीगाळ केली होती. यासंदर्भात करण यांनी यशच्या आई – वडिलाला सांगितले असता त्याच्यावर पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली होती. मुलाबाबत सांगितल्याचा राग मनात धरून करणला मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles