अहमदनगर -शहर व उपनगर परिसरात पावसाला सुरुवात. शहरासह तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली. तर विजेचे पोलही वाकले. त्यामुळे शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळी वार्याबरोबर सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसाने अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले होते. तर ग्रामीण भागातील शेतकर्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली होती.
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा फटका ; मोठे नुकसान
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी , पढेगाव परिसरात आज गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने कोपरगाव – वैजापुर रस्त्यावरील झाडे उन्मळुन पडली तसेच जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असुन विज वाहक तारा आणि खांबाचही अतोनात नुकसान झालय…सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहीती मिळतेय.