अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवती काँग्रेसची बैठक राज योग हॉटेल येथे संपन झाली व यामधे राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी महिला शहर जिल्हा अध्यक्ष रेश्माताई आठरे, युवती अध्यक्ष अँड.अंजली आव्हाड, युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजि.केतन क्षीरसागर, सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्ष साधनाताई बोरुडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र वाटप करण्यात आले असून आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारणी जाहीर करून उपाध्यक्षपदी सुनीता गुगळे, उपाध्यक्ष योगिता कुडिया, सिद्धार्थ नगर प्रमुख नईना शेलार, भिस्तबाग प्रमुख अश्विनी शिंदे, रेल्वे स्टेशन प्रमुख आफरीन सय्यद, माळीवाडा प्रमुख अंकिता फंड, शहर संघटक गौरी बोरुडे, शहर चिटणीस कीर्ती गुरव, शहर अध्यक्ष माधवी गालपेल्ली, चिटणीस कीर्ती गुरव, सदस्य मोहिनी दिकोंडा, कोमल मोहिते, सविता गालपेल्ली, पूजा पडोळे, पूनम पगारे, प्रमिला जावळे, रिजवाना मुल्ला, रेणुका बिल्ला, कल्पना गुगळे, शैला अभंग, वैष्णवी भांबरे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी महिला अध्यक्ष रेश्मा आठरे यांनी युवतींना मार्गदर्शन केले व अँड. अंजली आव्हाड यांनी प्रास्ताविकात राष्ट्रवादी पक्ष विषयी माहिती देत युवतींना विविध विषयी मार्गदर्शन केले व अभिजीत खोसे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या विकासकामाने व सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेने प्रेरित होऊन महिला व युवती राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आकर्षित होत आहे. त्यामुळे नारीशक्ती एकत्र आली तर सर्वांना हरवू शकते याच हेतूने शहरात अंजली आव्हाड हिच्यामार्फत युवतींचे व महिलांचे प्रश्न शासन स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून मांडणे व युवतींवर व महिलांवर कोठेही अत्याचार झाले तर तेथे धावून जाणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य कुटुंबातील युतींना व महिलांना पुढे घेऊन जात असतो. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पक्षात सर्वसामान्यांना कार्य करण्याची संधी भेटते व भविष्यात आपण जे पद घेतले आहे हे भूषवण्यासाठी नव्हे तर प्रत्येक भागातील प्रश्न मांडण्यासाठी नगर शहरातील युवतींना संधी देण्यात आली त्यामुळे आपापल्या पदाच्या माध्यमातून आपापल्या भागातील समस्या सोडवण्याचे सांगितले