शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या चोरीच्या तपासा बाबत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आमदार संग्राम जगताप यांना उपोषण स्थगित करण्याबाबतचे पत्र
पोलिसांनी साधला आमदार आणि व्यापाऱ्यांशी संवाद
व्यापाऱ्यांच्या तक्रारी पोलिसांनी गांभीर्याने घ्याव्या – आ. संग्राम जगताप
नगर : शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाले आहेत. पोलीस तपास वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे. यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे. या याबाबत पोलीस प्रशासनाला आमदार संग्राम जगताप यांनी निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी लेखी निवेदन दिले, यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले की, आडते बाजार दाळ मंडई येथील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधत तातडीने प्रश्न मार्गी लावा असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले, नगरची बाजारपेठ ही राज्यात नावलौकिक आहे या ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना घडत आहे, याकडे आपण लक्ष दिले नाही तर एखाद्या दिवशी दुर्दैवी अनुचित घटना घडू शकते, चोरीची घटना घडल्यावर आरोपींना तातडीने जेरबंद केल्यानंतर त्याच्यावर पोलिसांचा वचक राहील व अशा चोरीच्या घटना वारंवार होणार नाही, व्यापाऱ्यांच्या तक्रारी पोलिसांनी गांभीर्याने घ्याव्या, शहरातील चितळे रोड, मंगलगेट, सराफ बाजार येथील पोलीस चौकी तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, व्यापारी संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, सतीश मैड, कमलेश भंडारी, गोपाळ मणियार,अजिंक्य बोरकर, विश्वनाथ कासट, शांतीलाल गांधी, सुशील भळगट, हिरालाल चोपडा, अजित भंडारी,सतीश गुंदेचा, शैलेश गांधी, आदी उपस्थित होते.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले की, पोलीस प्रशासन चोरीच्या व दरोड्याच्या सर्व घटनांचा तपास गांभीर्याने लावत आहे, नगर जिल्हा हा विस्ताराने मोठा असून पोलिसांची संख्या कमी आहे, त्यामुळे ५५० पोलीस भरतीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे, व्यापाऱ्यांनी केवळ आपल्या दुकानांपुरते सीसीटीव्ही न लावता दुकानाबाहेर देखील लावावेत, आरोपी देखील तंत्रज्ञानाचा वापर करत चोऱ्या करत आहे, मात्र आम्ही पण त्यापुढे जाऊन आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद करत आहे, शहरातील दाळ मंडई, कापड बाजार आडते बाजार, सराफ बाजार यांना सुरक्षित ठेवणे आमचे कर्तव्य आहे, मागील चोरीच्या घटनांचा तपास प्रगतीपथावर असून मीरा मेडिकल येथील चोरीच्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे, नगर शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी असून हे एक श्रीमंत शहर आहे, या ठिकाणी अनुचित घटना घडून हे व्यापारी भयभीत होणे ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे तरी व्यापाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले,
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, आ,संग्राम जगताप यांनी चोरीच्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाची भेट घेत निवेदन देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार शहरात कारवाई सुरु आहे, विना नंबरच्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे, टवाळखोरांचा शोध घेण्यात येत असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, व्यापाऱ्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले
यावेळी तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी देखील व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
आ.संग्राम जगताप हे व्यापाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नाबाबत वारंवार आमच्याशी संपर्क साधत असतात, माझ्या १५ वर्षाच्या पोलीस खात्याच्या सेवेत पहिला आमदार असा पाहिला की, व्यापा-यांचे प्रश्न थेट आमच्या पर्यंत घेऊन येतात, असे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले
यावेळी पोलीस प्रशासनाकडून आ. संग्राम जगताप यांना मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या चोरीच्या तपासा बाबत उपोषण स्थगित करण्याचे लेखी पत्र देण्यात आले त्यात नमूद करण्यात आले की, अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील व्यावसायिक दीपक अहुजा यांच्या दुकानात झालेली चोरी व कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत प्रताप हर्दवानी यांची पैशाची बॅग हिसकावल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू असून दोन्ही गुन्ह्यांचा आढावा घेतला असून आम्ही स्वतः दोन्ही फिर्यादी यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सदर घटनेबाबत माहिती घेतली आहे. प्रभारी अधिकारी यांना गुन्ह्याची उकल करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना दिलेल्या आहेत.त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीत अचानक नाकाबंदी लावून विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच क्षमतेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली, असून सदर पथकामार्फत सदर गुन्ह्याचा सखोल तपास चालू आहे. दिनांक 28 नोव्हेंबर, 2023 रोजी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी व सुरक्षा बाबत आढावा घेऊन योग्य त्या उपयोजना करून मागणीप्रमाणे योग्य तो पोलीस बंदोबस्त बाजारपेठेत लावण्याबाबत कारवाई करीत आहोत. गर्दीच्या ठिकाणी प्रशासनामार्फत तसेच लोकसहभागातून जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठीची कारवाई करीत आहोत. अलीकडच्या काळात घडलेल्या शहरातील मेडिकल शॉप येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील आरोपीच्या मागावर पोलीस असून सदर गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास केला जाईल. तरी आपण आपले उपोषण स्थगित करावे, ही विनंती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी लेखी पत्राद्वारे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली आहे.