Friday, January 17, 2025

शिवालयात नगर शहरातील कारसेवकांचा विशेष सत्कार

नगर – आयोध्या येथे श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी 1990 च्या दशकात दोनवेळा कारसेवा झाल्या, या कारसेवेमध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने राममंदिर निर्माणासाठी अनेकजण या कारसेवेत सहभागी झाले होते. या कारसेवकांनी किती संकटे झेलावी लागतील याची पर्वा न करता अक्षरक्ष: घरदाराची पर्वा न करता कारसेवकांनी आयोध्या गाठून कारसेवा केली. या कारसेवेत ऐतिहासिक नगर शहरतील अनेकांनी सहभागी होत अन्याय, अत्याचार सहन केले. या कारसेवकांच्या अतुलनीय योगदान, बलिदान आणि त्यागातून आज आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होत आहे. आज त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करुन त्यांचा सन्मान करणे हे आपणा सर्वांचे कर्तुव्य आहे, असे प्रतिपादन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

प्रभु रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त शहर शिवसेना (ठाकरे गट)च्यावतीने आयोध्यामध्ये गेलेल्या कारसेवकांचा सन्मान शिवालय येथे करण्यात आला. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक योगिराज गाडे, अशोक दहिफळे, अंबादास शिंदे, गौरव ढोणे, पप्पू भाले, महेश शेळके, मनोज चव्हाण, संतोष डमाळे, अरुण झेंडे, दिपक भोसले, संजय आव्हाड, राजू ढोरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी कारसेवक प्रा.मधुसूदन मुळे, अंबादास पंधाडे, नरेंद्र कुलकर्णी, वाल्मिक कुलकर्णी, दत्तात्रय चवंडके, बबन आढाव, सुरेश क्षीरसागर, उल्हास ढोरे, अविनाश कांबळे, बबन आढाव, अविनाश झिकरे, गंगाराम हिरानंदानी, गौरव धोत्रे, कैलास दळवी, विनोद मुथा, मिलिंद गंधे, विठ्ठल पाठक, नंदकुमार सुपेकर, सुभाष पाठक, अनिल सबलोक आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अंबादास पंधाडे म्हणाले, नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रामभक्तांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांनी आपल्या जीवाची, घरादाराची पर्वा केली नाही. केवळ प्रभु श्रीरामाप्रती असलेली आस्था, श्रद्धा त्यांच्यासाठी अधिक महत्वाची होती. हा कोणत्याही पक्षासाठी राजकीय विषय नव्हता तो कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेचा मुद्दा होता. त्यामुळे अनेकांनी बलिदान देत आजचे श्रीराम मंदिर उभे राहिले आहे. स्व.अनिलभैय्या राठोड यांचे श्रीराम मंदिरासाठी नेहमीच प्रोत्साहन राहिले, कारसेवकांना ते नेहमी मदत करत. मंदिर निर्माणासाठी योगदान देणार्‍या असंख्य राम भक्तांचा प्रातिनिधीक स्वरुपात कारसेवकांचा सन्मान करुन त्यांच्या गौरव करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

याप्रसंगी प्रा.मधुसूदन मुळे म्हणाले, श्रीराम मंदिर निर्माणकार्यात कारसेवकांची महत्वाची भुमिका राहिली आहे, देशभरातील कारसेवकांच्या अथक परिश्रमरातून बाबरी ढाचा पाडला गेला आणि आज त्या ठिकाणी प्रभु श्रीरामांचे मंदिर उभे राहत आहे, यासारखा आनंद नाही. नगरमधून आम्ही सहभागी झालेले कारसेवकांनी अनेक संकटे, यातना सोसत त्या ठिकाणी दाखल झालो होतो. आज त्या लढ्याला यश आले आहे. आमच्या सन्मानाने पुन्हा त्या आठवणी जागृत झाल्या असल्याचे सांगितले.

प्रास्तविकात विक्रम राठोड यांनी आयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी मोठा संघर्ष करावा लागला. असंख्य लोकांच्या बलिदान, त्यातून हे मंदिर उभे राहत आहे. त्यावेळी स्व.अनिलभैय्या राठोड यांनीही नगरमधून या लढ्याला पाठबळ देण्याचे काम केले. त्यातील कारसेवकांचा आज सन्मान करुन त्याच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला असल्याचे सांगितले.

कारसेवक सुरेश क्षीरसागर, अनिल सबलोक, कैलास दळवी आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अशोक दहिफळे यांनी केले तर आभार योगीराम गाडे यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles