Monday, June 17, 2024

पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी,पक्षश्रेष्ठींकडे मोठी मागणी

नगर – भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून लढवावी. नुकत्याच झालेल्या लोककसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांना नगर शहरातून मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे. येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्षशील व लढवैय्या नेत्रृत्वाला जर नगर मधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून पंकजा मुंडे यांना नगरमधून तिकीट देण्याची मागणी केली असल्याचे पत्रक भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी काढले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी येणारी विधानसभा निवडणूक नगर शहरातून लढवावी अशी साद घालणारे पत्रक अॅड. अभय आगरकर यांनी काढले आहे. हे पत्रक त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंदीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे.

पत्रकात अॅड. अभय आगरकर पुढे म्हणाले आहेत, लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी नगर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्या बरोबरच शहरातल गुंडगिरीलाही लगाम त्याकाळात घातला होता. त्यांचा कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी. अशी आमची पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles