Friday, January 17, 2025

निवडणूक लोकसभेची…नगर शहरात चर्चा अभिषेक कळमकर यांच्या आमदारकीची…

लोकसभा निवडणुकीत लंकेंसाठी नगर शहरात अभिषेक कळमकर यांची सक्रियता चर्चेत…. विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी सज्जता?

नगर: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर दक्षिण मतदारसंघात अनेक नेते आपापल्या पक्षाकडून सक्रिय झाले आहेत. यात महाराष्ट्रात पुढील काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचेही आराखडे बांधण्यात येत आहेत. नगर शहरात विद्यमान आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये असून ते हॅटट्रिकसाठी प्रयत्न करणार आहेत. त्याचवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झालेले माजी महापौर अभिषेक कळमकर हे माजी आमदार निलेश लंके यांच्या प्रचारात हिरीरीने सहभागी झाले आहेत. पक्षाचा मेळावा, प्रचार रॅलीत, विविध मिडियाच्या चर्चांमधून ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बाजू मांडत आहे. कळमकर हे विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार होऊ शकतात अशी खुली चर्चा शहरात आहे. त्यांचे काका माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वैयक्तिक संबंध पाहता अभिषेक कळमकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी सहज शक्य असल्याचे चित्र आहे. अर्थात महाविकास आघाडीत नगरची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कळमकर यांच्यासाठी ही जागा सोडतील का हा सुद्धा मुद्दा आहे. अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंशी चांगले संबंध तयार केले. त्याचा फायदाही त्यांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी होऊ शकतो असा एक मतप्रवाह आहे. कळमकर यांचा कालच वाढदिवस साजरा झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कळमकर यांनी लोकसभा निवडणुकीनिमित्त विधानसभेची तयारी सुरू केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles