Thursday, July 25, 2024

राधिका भरतनाट्यम् अ‍ॅकेडमीच्या कला साधकांची उज्वल निकालाची परंपरा कायम

राधिका भरतनाट्यम् अ‍ॅकेडमीच्या कला

साधकांची उज्वल निकालाची परंपरा कायम

नगर – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल 2024 सत्राचा निकाल टप्या टप्प्याने जाहीर होत आहे. यामध्ये आदर्शनगर, कल्याण रोड येथील राधिका भरतनाट्यम नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांनी संचालिका सौ.कविता भांबरे- घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदिपक यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्रारंभिक- रितीशा कोरडे, अनुष्का चोबे, ओवी गायकवाड, रिवा राऊत, हिमानी बोरुडे, रेणुका खांदे, गार्गी अनभुले, श्रेया शिंदे, आराध्या कवाष्टे. प्रवेशिका प्रथम- संतानिका लोडे, स्वरा जाधव, वेदांगी बोराडे, इशिका भागवत, प्रगती अगरवाल. प्रवेशिका पूर्ण – रेणुका शिंदे, सिद्धी आडेप, वेदिका गावडे, प्रणाली रसाळ, ईश्‍वरी कवाष्टे, प्रचिती शिंदे, तनिष्का दळवी. मध्यमा प्रथम- मृणालिनी शेरकर. विशारद प्रथम- गौरी तिकोने. विशारद पूर्ण- सिद्धी गांधी, तुलसी ओस्तवाल, कृष्णा लगड.

यासर्व विद्यार्थ्याना भरतनाट्यम परीक्षे करीता केंद्र प्रमुख देऊळगावकर, सहाय्यक आश्‍लेषा पोतदार, पृथ्वी सुपेकर, मंदार फुलारी यांचे सहकार्य लाभले. आदर्शनगर येथील पारुनाथ ढोकळे, प्राचार्य खासेराव शितोळे, प्रकाश लगड, संतोष दसासे, अ‍ॅड.सुधीर शेटे, विजय गाडळकर, भगवान काटे, राजेंद्र पवार, परशुराम कोतकर यांनी अभिनंदन करुन लवकरच सत्कार समारंभाचे आयोजित केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles