Thursday, July 25, 2024

Ahmednagar news :१५ वर्षीय युवतीने उचलले टोकाचे पाऊल

नगर – एका १५ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी नगर शहराजवळील पदमपुरवाडी (वाकोडी, ता.नगर) येथे घडली.

अज्ञात करणातून एका १५ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेतला. ही बाब तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यावर तिच्या वडिलांनी बेशुद्धावस्थेत असलेल्या त्या युवतीला रात्री ८ च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ.विशाखा शिंदे यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

तेथे दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जठार यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. या वरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो.हे.कॉ. रायचंद पालवे हे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles