Sunday, December 8, 2024

आगरकर मळा अर्बन बँक कॉलनी येथे पाणीटंचाई ; आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन

आगरकर मळा अर्बन बँक कॉलनी येथे पाणीटंचाई ; नागरिक त्रस्त – दत्ता जाधव

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन

नगर : आगरकर मळा, अर्बन बँक कॉलनी येथे गेल्या दोन वर्षापासून नळाद्वारे पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा करूनही पाणी प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे नागरिकांना पैसे देऊन टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते, तरी लवकरात लवकर अर्बन बँक कॉलनीतील पाणी प्रश्न मार्गी लावा अशी मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी केली.
आगरकर मळा, अर्बन बँक कॉलनीतील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देताना सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, निसळ गुरुजी, केशव खानदेशे, नानासाहेब दळवी, विजय गायकवाड, धिरज रपारिया, अवानी रपारिया,सोनाली निसळ आदी उपस्थित होते.

आगरकर मळा येथील मनपाची पाण्याची उंच टाकी व जमिनीवरील टाकी गेल्या एक वर्षापासून स्वच्छ केली नसून ती स्वच्छ करून द्यावी, सध्या आगरकर मळ्यामध्ये साथीचे आजार पसरत असून त्यावर उपाय योजना होणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव खानदेशे यांनी केले.

आयुक्त यशवंत डांगे यांनी शिष्टमंडळात सांगितले की, आगरकर मळा अर्बन बँक कॉलनी मधील पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे काम मंजूर असून येत्या आठ ते दहा दिवसात सुरू होईल, तोपर्यंत या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती यावेळी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles