हमदनगर : नव्या फेब्रुवारी महिन्याचा पहिला गुरुवारचा दिवस नगरकरांसाठी पाण्याची बोंबाबोंब करणारा ठरला. महापालिकेने वीज बिल थकबाकीचे सुमारे ३ कोटी रुपये भरले नसल्याने महावितरणने बुधवारी सायंकाळी सात वाजता पाणी योजनेची वीज तोडली.महापालिका व महावितरण यांच्यातील पाणी वीज बिलाचे वाद २५ ते ३० वर्षांपासूनचे आहेत. जुनी वादग्रस्त असलेली वीजबिलाची थकबाकी तब्बल ३३० कोटी रुपयांची आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने किमान चालू वीज बिल भरण्याची तडजोड झाली आहे. मात्र, हे पैसेही मनपा नियमित भरत नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. मनपाने मुळा धरणातून नगर शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी तीन ठिकाणी उपसा करावा लागत असल्याने मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर उपकेंद्रासाठी वीज कनेक्शन घेतले आहे. या तिन्ही वीज कनेक्शनचे मिळून महिन्याला वीज बिल सरासरी २ कोटी ८० लाखापर्यंत येते. हे पैसे वेळच्यावेळी महापालिकेकडून भरले जात नसल्याने महावितरणकडून पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशारा दिला जातो. मध्यंतरी अशी वीज काही तासांसाठी बंद केली गेली होती.
त्यानंतर महापालिकेने टप्प्या टप्प्याने पैसे देत डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत सुमारे ३ कोटी महावितरणकडे जमा केले. मात्र, जानेवारी २०२४ ची चालू बिलाची सुमारे २ कोटी ९० लाखाची थकबाकी तातडीने भरावी, असा तगादा महावितरणने लावला होता. मनपाकडे पुरेसे पैसे नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. पण पैसे आले नसल्याने बुधवारी (३१ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता मुळा धरण येथील मुख्य वीज कनेक्शनची वीज महावितरणने तोडली.
महापालिकेने ३ कोटी थकबाकी न भरल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित. नगर शहरात निर्जळी
- Advertisement -