शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा डॅम येथील प्रकल्पाचा वीज पुरवठा महावितरणच्या विद्युत कामासाठी शनिवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे नगर शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा शनिवार (ता. २५)पासून तीन दिवस विस्कळीत होणार आहे.शनिवारी (ता. २५) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. हा पाणी पुरवठा रविवारी (ता. २६) होईल.
रविवारी (ता. २६) मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगालचौकी, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, टीव्हीसेंटर परिसर, मुन्सिपल हाडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायकनगर या भागात पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी सोमवारी (ता. २७) होईल.
सोमवारी (ता. २७) सिद्धार्थ नगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, कापड बाजार, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्या ऐवजी मंगळवारी (ता. २८) होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे