अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाले बाबत .
मंगळवार दि 24/09/2024 रोजी रात्री ९.१५ वाजलेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने उच्च दाब विज वाहिनीवर विळद घाट परिसरात बिघाड निर्माण झाल्याने शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झालेला होता. विज वितरण कंपनीचे कर्मचारी व मनपा चे कर्मचारी यांना तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेवून आज पहाटे 3.05 वाजता पुर्ण केले .
विज पुरवठा सुरू झाले नंतर वसंत टेकडी येथे सकाळी ६.०० वाजता पुर्ण दाबाने पाणी उपसा सुरू झालेला आहे.
सलग सहा तास विज पुरवठा बंद राहील्याने शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. त्यामुळे आज दि.२५/०९/ २०२४ रोजी पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. आज पाणी पुरवठा न झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदया दि. २६/ ०९/ २०२४ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .
तसेच आज दि.२५/०९/२०२४ रोजी उपनगर भागास उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे .
तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे जाहिर आवाहन अहमदनगर महानगर पालिकेने केलेले आहे