भाजपाचे उमेदवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार निलेश राणे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (दि. ७) दुपारी साडेचार वाजतासावेडी परिसरात असलेल्या संत निरंकारी भवन पटांगणावर सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी कुठल्या मुद्द्यावर बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड तालुयात सभा होणार आहे. त्याच दिवशी कर्जत आणि पारनेरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. त्याच दिवशी पाथर्डी तालुयात आमदार नितेश राणे यांची रॅली काढण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची श्रीगोंदा तालुयात दि. १० मे रोजी सभा होणार आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांची पाथर्डी तालुयात सभा होणार आहे.
लोकसभा निवडणूक प्रचाराची सांगता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेने होणार आहे. यानिमित्त नगर शहरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रॅली काढण्यात येणार आहे.