काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष युवक क्रीडा व प्रवक्ता अहमदनगर शहर युवक कॉंग्रेस
नगर –
किरण काळे हा पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी होता. त्याची राष्ट्रवादीतून हाकालपट्टी झाल्यामुळे तो राग मनात धरून ठराविक व्यक्तींवरच टीका करण्याचे काम करत आहे. खरतर राष्ट्रवादीतून किरण काळेची का हाकालपट्टी झाली ही बाब सुध्दा समोर येणे गरजेचे आहे. किरण काळे याची स्वतःच्या सारोळा कासार या गावाकडील ग्रामपंचायत सदस्यही होण्याची लायकी नाही तरी काँग्रेसच्या युवकांनी काळे याच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे वाटोळे करू नये असे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भिंगार युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, सूरज गुंजाळ हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,
नगर शहरातील तारकपूर भागातील एका नामंकित हॉस्पिटलच्या मालकाला ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागितल्याच्या कारणावरून हॉस्पिटल मालकाने थेट खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे पुराव्यानिशी समक्ष तक्रार दिल्यामुळे किरण काळे याला सुप्रियाताई यांनी गाडीतून खाली उतरून दिले व पक्षातून तडकाफडकी हाकालपट्टी केली.
काही दिवसांपूर्वी श्री. हेरंब कुलकर्णी सर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर सर्व पक्षातील पदाधिकान्यांनी या घटने संदर्भात अवैध व्यवसाय बंद करणेबाबत ठाम भुमिका घेतली होती. किरण काळे यानी ही शहरातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी आपले दंड थोपटले होते. त्या काळात काही स्टींग ऑपरेशनही केले व स्टींग ऑपरेशनचा मोठा गाजावाजा देखील केला. परंतु नंतर शहरातील या अवैध व्यवसायांबाबत कोणतेही स्टेटमेंट किंवा आंदोलन झाल्याचे दिसून येत नाही. कारण एखादा अवैध व्यवसायिकाला टारगेट करून बाकीच्या अवैध व्यवसायिकांकडून पाकीट चालू करून आपले खाजगी शौक पूर्ण करून घेण्याचा याचा व्यवसाय आहे. हा नेहनी आंदोलन करून शांत का बसतो हेच या मागचे खरे रहस्य आहे.
किरण काळे यांनी आजपर्यंत अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील भरपूर असा नामांकित व्यक्तींकडून ज्यामध्ये उद्योगपती व व्यपारी अशा व्यक्तींचा समावेश आहे. यांना सुध्दा विविध कारणांवरून ब्लॅकमेलिंग केलेले आहे व त्यांच्याकडून पैशाची मागणी केलेली आहे. त्याबाबत माझ्याकडे सबळ असा पुरावा असून तो मी योग्य वेळ आल्यावर सादर करणार आहे.
किरण काळे याने आपल्या ऑफीसला माजी आमदार अनिल राठोड यांचा फोटो लावला आहे. ज्या राठोडांनी आयुष्यभर आमच्या कॉंग्रेस पक्षावर टिका केली, त्यांचा फोटो लावून शिवसेनेचे मत मिळविण्याचा याचा केविलवाना प्रयत्न करत आहे.
याची स्वतःच्या सारोळा कासार या गावाकडील ग्रामपंचायत सदस्यही होण्याची लायकी नाही. नगर शहरामध्ये सन 2019 साली वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुक लढवून डिपॉजीट जप्त होण्याची नामुश्की याच्यावर आली होती आणि दुसऱ्यांचे फोटो लावून याला कोण मत देणार, याच्याकडे कोणता विकासाचा अंजेडा आहे, मुळात यालाच विकास नको आहे आणि विकासाच्या गप्पा मारतो. प्रत्येक गोष्टीमध्ये नाकारात्मक दृष्टीकोन ठेवून पक्षाच्या नावाखाली वैयक्तीक अजेंडा चालवून नागरिकांच्या मनामध्ये कायम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. या चूकीच्या विचारसरणीमुळे कॉंग्रेसचे आजी माजी नगरसेवक काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी काँग्रेस सोडून दुसरीकडे निघून गेलेले आहे.
काही दिवसापूर्वी अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे किरण काळे याला कॉंग्रेस पक्षाच्याच जिल्ह्यातील विविध पदाधिकान्यांनी एका महत्त्वाच्या बैठकीतून हाकलून लावले होते. ते का लावले होते. याचा अर्थ किरण काळे यांना चांगलाच माहिती होता.
किरण काळे याची सध्या फेसबुकवरील प्रतिक्रीया पाहीली तर त्यावरून निश्चितच असे दिसते की, किरण काळे हे स्वतः वाद कसे निर्माण होतील व त्या वादातून स्वतःला कसा फायदा करून घेता येईल. याच आशयाने एकेरी उल्लख करत चिथावणीखोर भाष्य करत आहे. तरी माझी सर्व युवक कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, किरण काळे याच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे वाटोळे करू नये. असे यावेळी ते म्हणाले.