Tuesday, February 27, 2024

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटलांची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विजय निश्चय मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. सोलापूर दौरा आटोपून बुधवारी पाटील नगर शहरामध्ये राष्ट्रवादी भवन येथे दाखल झाले. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांचे काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना काळे म्हणाले, निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आलेला निकाल हा धक्कादायक आहे. निवडणूक आयोग नि:पक्षपातीपणे काम करत आहे की नाही याबद्दल जनमानसात संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. असे असले तरी देखील महाराष्ट्र मधील महाविकास आघाडी ही महायुतीचा येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव करण्यासाठी आणि देशाचे संविधान वाचविण्यासाठी एकसंधपणे लढत आहे. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. लवकरच महाविकास आघाडीचा नगर दक्षिणेचा उमेदवार जाहीर करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते प्रतापकाका ढाकणे, काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, सावेडी उपनगर विभाग अध्यक्ष अभिनय गायकवाड, क्रीडा व युवक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles