राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आज अहमदनगर दौऱ्यावर
आखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री कॅप्टन अजयसिंग यादव साहेब व खासदार (राज्यसभा सदस्य)माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब हे विधानसभेच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यात दौऱ्यावर असून आज सकाळी 11 वाजता ते जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणार आहेत तसेच त्यानंतर ते
*अहमदनगर शहरात
हॉटेल पॅराडाईज या ठिकाणी
दु 2 वा. विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत तसेच त्यानंतर ते पदाधिकारी यांची आढावा बैठक घेणार आहेत व त्यानंतर सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, विविध महिला संघटनाचे प्रतिनिधी व वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक , विविध उदयोजक, विविध व्यावसायिक प्रतिनिधी या प्रमुख भेटी गाठी घेऊन ते नगर शहराच्या विधानसभेच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करून विधानसभेसाठी चाचपणी करून तसा त्यांच्या दौऱ्याचा अहवाल ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब व खासदार राहुलजी गांधी साहेब यांच्याकडे देणार आहेत. तरी विविध सामाजिक संघटनेच्या ज्या प्रतिनिधी यांना निमंत्रित केले आहे त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी केले आहे…
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आज अहमदनगर दौऱ्यावर
- Advertisement -