मुंबई :- काँग्रेस पक्ष्याच्या वतीने राज्यभरातील माळी समाजातील प्रमुख संघटनेचे प्रतिनिधी व पक्ष्यातील पदाधिकारी यांची बैठक मुंबई येथे टिळक भवन प्रदेश कार्यालयात काँग्रेस प्रदेशअध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ, ओबीसी प्रदेशअध्यक्ष भानुदास माळी, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार कृष्णराव इंगळे आदीसह सर्व जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष्यात गेल्या 15-20 वर्ष्यापासून काम करणाऱ्या माळी समाजातील पदाधिकारी यांच्यावर मागील काळात अन्याय झला असेल परंतु यापुढील काळात कोणावरही अन्याय होणार नाही तसेच ग्राउंड लेव्हलवर अनेक वर्ष काम करणाऱ्या पक्ष्यातील माळी पदाधिकारी यांना ताकद देऊन योग्य संधी विधानसभेच्या रूपाने देणार असून कोणतीही शंका मनात न ठेवता जनतेत जाऊन काम करत राहण्याचे आवाहन काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले साहेबांनी केले. काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने विधानसभेला 27 जागा मागितल्या असून त्यापैकी ज्या मतदारसंघात माळी समाज मोठया संख्येने आहे तिथे माळी समाजाचा ऍक्टिव्ह असलेला पदाधिकारी उमेदवार असेल त्यामुळे माळी समाजाने काँग्रेसचा विचार स्वीकारून काँग्रेसला साथ दिल्यास राज्यात काँग्रेस सत्तेवर येऊ शकते कारण ओबीसी प्रवर्गात माळी समाज सर्वात मोठा असल्याने त्या समाजाची भूमिका येणाऱ्या निवडणुकीत फार निर्णायक ठरणार आहे.ओबीसी समाजाला या निवडणुकीत संधी दिली नाही तर हा समाज काँग्रेसपासून दुरावण्याची भीती काँग्रेसला असल्याने यावेळी काँग्रेस पक्ष ओबीसी समाजाच्या बाबतीत फार सिरीयस असून स्वतः राहुलजी गांधी हे येणाऱ्या विधानसभेला ओबीसिंना संधी देण्याच्या तयारीत असल्याचे नाना पटोले साहेबांनी सांगितले.यावेळी माळी समाजाच्या वतीने पटोले साहेबांचा फुले पगडी देऊन सत्कार करण्यात आला व माळी समाजाला संधी दिल्यास राज्यतील माळी समाज पूर्ण ताकदीने काँग्रेसच्या मागे उभा राहील असे आश्वासन यावेळी माळी समाजातील प्रमुख प्रतिनिधी यांनी दिले..
काँग्रेसमध्ये माळी समाजाला येणाऱ्या विधानसभेला योग्य संधी देणार -प्रदेशअध्यक्ष नाना पटोले
- Advertisement -