अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या शंकर बाबा सावली मठात चोरीचीघटना घडली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. घटना मंदिर पुजारांनी कोतवाली पोलीस स्टेशनला माहिती दिली होती हा प्रकार सकाळी मंदिराचा पुजारी आल्यावर लक्षात आली. पोलिसांनी आणि मंदिर पुजारी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती अंगावर घोंगडी घेऊन मंदिरात प्रवेश करताना दिसून आला. त्याने सहजरित्या मंदिरात असलेली दानपेटी उचलून नेऊन पोबारा केला आहे.
पोलीस श्वान पथक तसेच ठसे तज्ञांनी मंदिरात भेट देऊन तपासणी केली. मात्र काही अंतर गेल्यावर श्वान पथक जागेवर थांबले. त्यामुळे चोरटे गाडीत बसून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध दानपेटी चोरून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नगर शहरातील शंकर बाबा मठात चोरी,दानपेटी घेऊन चोरटा पसार
- Advertisement -