Saturday, May 25, 2024

Ahmednagar crime…सख्ख्या भावाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस शिताफीने अटक

कर्जत : तालुक्यातील हिंगणगाव शिवारामध्ये सख्ख्या भावाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस मोठ्या शिताफीने पाठलाग करून त्याच्या मुस्क्या आवळल्या, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी दिली.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील हिंगणगाव येथे गणेश विकास काळे याने त्याचा भाऊ नितीन उर्फ मिथुन विकास काळे यांच्यात वादातून मारामारी झाली. मारामारी सोडवण्यास गेलेली त्यांची आई रुबीना याही जखमी झाल्या होत्या. मारहाणीत नितीन याचा मृत्यू झाला होता. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता घडली होती.

या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. यानंतर आरोपीच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके तयार करण्यात आली होती.

तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना माहिती मिळाली की आरोपी हा हिंगणगाव गावाच्या शिवारात असलेल्या ओढ्याच्या काटवनामध्ये लपून बसलेला आहे. यानंतर तत्काळ तिथे पोलीस पथक गेले. दरम्यान पोलीस आल्याचा सुगावा आरोपी गणेश काळे याला लागला. तो पळून जात असताना मात्र मोठ्या शिताफीने पोलीस कर्मचारी दीपक कोल्हे आणि पोलीस कर्मचारी मुरकुटे यांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या. दरम्यान या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस कर्मचारी संभाजी वाबळे, पोलीस नाईक रवींद्र वाघ, दीपक कोल्हे, महादेव कोहोक, मनोज मुरकुटे, योगेश सुपेकर, किरण बोराडे यांनी ही कामगिरी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles