Monday, September 16, 2024

Ahmednagar crime :पतीचा खुन करणारी वकील पत्नी प्रियकरासह ताब्यात

पाचेगांव ता. नेवासा येथे पतीचा खुन करणारी वकील पत्नी प्रियकरासह ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 16/08/2024 रोजी सकाळी 09.00 वा. चे पुर्वी पाचेगांव ता. नेवासा शिवारात शिवाजीराव पवार मेडीकल कॉलेजचे जवळ शेतगट नंबर 207 मध्ये एक अनोळखी इसमाचा कोणीतरी धारदार शस्त्राने गळा कापुन खुन झाल्याची घटना झाल्याने सदर घटनेबाबत पोलीस पाटील श्री संजय लक्ष्मण वाकचौरे रा. पुनतगांव, ता. नेवासा जि. अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 772/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 238 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोनि श्री दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व पोनि श्री धनंजय जाधव, नेवासा पोलीस ठाणे यांना आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर, शरद बुधवंत, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भाग्यश्री भिटे यांचे एक पथक व पोनि/धनंजय जाधव, नेवासा पोलीस स्टेशन यांनी त्यांचेकडील पोलीस अंमलदार राजु केदार, अरुण गांगुर्डे, आप्पा तांबे, नारायण डमाळे, अमोल कर्डीले, सुमीत करंजकर, गणेश जाधव, गणेश फाटक यांचे एक पथक तयार करुन सदर पथकांना सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती.
सदर दोन्ही पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन गुन्हा ठिकाणची बारकाईने पाहणी केली. तसेच घटनाठिकाणचे आजुबाजुचे लोकांना मयताची माहिती देवुन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु सदर मयताची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे सदर मयत हा बाहेर जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मयताचे फोटो महाराष्ट्रामधील सर्व पोलीस स्टेशनला, तसेच व्हॉटस्ऍ़प ग्रुपवर पाठविण्यात आलेले होते. दोन्ही पथकांनी गुन्हा घडले ठिकाण पासुन नेवासा, श्रीरामपुर जाणारे रोडवरील सलग 7 दिवस सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपींची माहिती काढत असतांना घटनाठिकाणचे आजुबाजुस रॅनॉल्ट ट्रिबर गाडी संशयीत रित्या फिरत असतांना मिळुन आली. सदर गाडीचे माहिती काढुन गाडी मालकाची माहिती काढली असता सदरची गाडी ही अंबादास भानुदास म्हस्के रा. रमाबाई नगर, जुना जालना, मोतीबागजवळ, ता. जि. जालना याचे नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर गाडी मालकाचा शोध घेत असतांना त्याचा फोन मागील 15 ते 20 दिवसांपासुन बंद असल्याने त्याची पत्नी मिना अंबादास म्हस्के हिची माहिती काढली असता ती लोणी, ता. इंदापुर, जि. पुणे येथे भाडोत्री खोली घेवुन राहत असल्याची माहिती मिळाली.
दिनांक 29/08/2024 रोजी लोणी, ता. इंदापुर, जि. पुणे येथे जावुन मिना म्हस्के हिचा शोध घेत असतांना ती एका इसमासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे 1) लहु शिवाजी डमरे वय 31 वर्षे, ढोकसळ, ता. बदनापुर, जि. जालना, 2) मिना अंबादास म्हस्के वय – 36 वर्षे, रा. रमाबाई नगर, जुना जालना, मोतीबागजवळ, ता. जि. जालना असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विश्वासात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता लहु शिवाजी डमरे याने त्याचे मिना अंबादास म्हस्के हिचेसोबत प्रेमसंबध असुन तिचा मयत पती अंबादास भानुदास म्हस्के रा. रमाबाई नगर, जुना जालना, मोतीबागजवळ, ता. जि. जालना हा नेहमी तिस त्रास देवुन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुणे या ठिकाणी कामाकरीता जायचे आहे असे सांगुन त्यास रेनॉल्ट ट्रिबर गाडीमध्ये घेवुन येवुन रात्रीचे वेळी त्याचा गळा आवळुन तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा कापला व तेथुन निघुन गेल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व श्री सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles