Saturday, March 22, 2025

अहमदनगर वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या, एका हाॅटेलवर पोलिसांनी टाकला छापा

श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने तालक्यातील कोल्हार खुर्द येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या एका हॉटेलवर दि. 24 रोजी पहाटेच्या दरम्यान छापा टाकला. यावेळी दोन तरूणींची सुटका करून वेश्याव्यसाय चालवणार्‍या एका जणाला ताब्यात घेऊन गजाआड केले.

श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना वेश्याव्यसाय सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी गुप्त खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या हॉटेल अपना नाष्टा सेंटर येथे प्रथम एक डमी ग्राहक पाठविण्यात आले.
तेथे वेश्याव्यसाय सुरू असल्याची खात्री होताच दि. 24 जानेवारी रोजी पहाटे तीन वाजे दरम्यान छापा टाकला. त्या ठिकाणी पोलीस पथकाला वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी दोन तरूणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. व्यवसाय चालविणार्‍या एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.

पोलीस नाईक आजिनाथ पाखरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वेश्याव्यसाय चालविणारा आरोपी वसंत रघुनाथ लोंढे, वय 56 वर्षे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 92/2023 भादंवि कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे स्रीयांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस उप निरीक्षक निरज बोकील, पोलिस नाईक विकास साळवे, सचिन ताजणे, नदिम शेख, रोहित पालवे, महिला पोलिस नाईक मंजुश्री गुंजाळ, चालक जालिंदर साखरे आदी पोलीस पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles