Sunday, July 21, 2024

नगर शहरात एकाच वेळी छापे, गोवंश मांस, जिवंत जनावरांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर शहरात एकाच वेळी तीन ठिकाणी छापा टाकुन महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 125 किलो गोमास, जिवंत जनावरे व साधने असा एकुण 1,38,100/- (एक लाख अडतीस हजार शंभर) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमास विक्री व वाहतुकी विरुध्द माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले हाते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, सचिन आडबल, पोकॉ/आकाश काळे, विनोद मासाळकर, योगेश सातपुते व चापोना/भरत बुधवंत अशांना बोलावुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अहमदनगर शहरात झेंडीगेट, हमालवाडा परिसरात दोन ठिकाणी तसेच घासगल्ली कोठला, अहमदनगर येथे एक अशा एकुण तीन ठिकाणी काही इसम गोवंश जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने बांधुन ठेवली आहेत व काही इसम मोपेड गाडीवरुन विक्री करण्यासाठी घेवुन जाणार आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. अनिल कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील प्राप्त माहिती प्रमाणे खात्री करुन अहमदनगर शहरात झेंडीगेट, हमालवाडा परिसरात दोन ठिकाणी व घासगल्ली कोठला, अहमदनगर येथे एक ठिकाणी असे एकुण तीन ठिकाणी एकाच वेळी कारवाई करुन 125 किलो गोमास व तुकडे, जिवंत जनावरे, एक मोपेड, एक वजन काटा व एक सुरा असा एकुण 1,38,100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोन व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील एक असे तीन आरोपी विरुध्द भादविक 269 सह महाराष्ट्र पशुसुधारणा अधिनियम कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे कारवाई करुन एकुण-03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन व गु.र.नं व कलम आरोपीचे नाव जप्त मुद्देमाल
1. कोतवाली 65/23 भादविक 269 सह मपुसुअक 5 (क), 9 (अ) 1) इम्रान वाहिद कुरेशी वय 27, रा. हमालवाडा, झेंडीगेट, अहमदनगर 7,500/- 50 किलो गोवंश तुकडे
500/- वजन काटा
2. कोतवाली 66/23 भादविक 269 सह मपुसुअक 5 (क), 9 (अ) 2) अस्लम मुसा कुरेशी वय 47, रा. सईदु कारंजा, झेंडीगेट, अहमदनगर 10,000/- 50 किलो गोमास
40,000/- मोपेड
3. तोफखाना 74/53 भादविक 269 सह मपुसुअक 5 (अ) (ब) (क), 9 (अ) (ब) 1) सोहेल रऊफ कुरेशी वय 21, रा. सदर बाजार भिंगार अहमदनगर 5000/- 25 किलो गोमास
75000/- तीन मोठ्या गाई व तीन लहान वासरु
100/- लोखंडी सुरा
एकुण 3 पुरुष आरोपी 1,38,100/- गोवंशीय जातीचे 125 किलो गोमास, जिवंत जनावरे, एक मोपेड, वजन काटा व लोखंडी सुरा

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles