Sunday, July 14, 2024

नगर शहरातील घटना…युवकावर कोयत्याने हल्लाकरून जीवे मारण्याचा प्रयत्न

नगर-मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या युवकावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. विशाल मच्छिंद्र शिरवाळे (वय 24 रा. काटवन खंडोबा, महात्मा फुले वसाहत) असे जखमीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संग्राम गीते (रा. रभाजीनगर, केडगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केडगाव उपनगरात ही घटना घडली आहे.

विशाल शिरवाळे सोमवारी रात्री त्यांचे मित्र रोहित कोल्हे व आशू भिंगारदिवे यांना भेटण्यासाठी दुचाकीवरून केडगाव येथे जात असताना त्यांना राम मंदिरामागे संग्राम गीते याने अडविले. तु सातपुतेच्या पोरांमध्ये राहतो, तुझी लायकी आहे का?, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून, तुला तर मारूनच टाकतो, असे म्हणून कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. जखमी झालेल्या विशाल शिरवाळे यांनी आरडाओरडा केला असता एक दुचाकी त्यांच्या दिशेने आली, तोपर्यंत संग्राम गीते त्याच्या दुचाकीवरून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles