Home नगर जिल्हा करुणा शर्मांच्या अडचणी वाढल्या, नगर जिल्ह्यात गुन्हा दाखल…

करुणा शर्मांच्या अडचणी वाढल्या, नगर जिल्ह्यात गुन्हा दाखल…

0
1066

करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शर्मा यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारदाराविरोधात करुणा शर्मांच्या वतीनं आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणा शर्मा यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा पक्ष काढण्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये करुणा शर्मा यांनी घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 22 लाख 45 हजार रोख आणि 12 लाखांचे सोने घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. उसनवारी म्हणून दिलेली रक्कम आणि सोने परत मागितल्याने जीवे मारण्याची धमकी करुणा शर्मा यांनी दिली असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. संगमनेर तालुक्यातील कोंची येथील फिर्यादी भारत भोसले यांनी हे आरोप केले आहेत. 7 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.