Wednesday, November 29, 2023

भांडणात मध्यस्थी आंगलट… रागातून घडला हा प्रकार नगर शहरातील घटना…

अहमदनगर (प्रतिनिधी) – घरगुती भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून त्या कुटुंबाच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न सावेडीत घडला. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी वेदांत अंबादास आकुल (वय 22, रा. भिस्तबाग चौक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत रमेश रोल्ला यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ते सावेडीच्या पाईपलाईन रस्त्यावरील भिस्तबाग चौकातील प्रशांतनगरमध्ये राहतात.आरोपी वेदांत आकुल त्यांच्या शेजारीच राहतो. गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वेदांत आकुल हा दारू पिऊन त्याची आई सपना व वडील अंबादास यांनी शिवीगाळ व मारहाण करीत असताना रमेश रोल्ला यांच्या आई शोभा रोल्ला यांनी मध्यस्थी केली.

त्या वेदांतला समजावून सांगत असताना त्याने त्यांना धक्का देऊन ढकलून दिले व निघून गेला. त्यानंतर रमेश रोल्ला व त्यांच्या आई शोभा रोल्ला स्वतःच्या घरी आल्यावर वेदांतने अचानक पाण्याच्या रिकाम्या बाटलीत पेट्रोल वा रॉकेल भरून आणून त्याला आग लावून ती बाटली रोल्ला यांच्या घरात फेकली. त्यामुळे त्यांच्या घरातील चादर, चटईला आग लागली. घरातील व्यक्तींनी धावपळ करून ही आग विझवली. यावेळी वेदांत आकुल याने रोल्ला यांना शिवीगाळ करून तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी देऊन तो पळून गेल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: