Wednesday, April 30, 2025

अहमदनगरमध्ये फोटोग्राफरने अल्पवयीन मुलीचे नको त्या अवस्थेत फोटो काढले… पुढे घडलं भलतंच!

अहमदनगर – एका लग्न समारंभात ओळख झालेल्या फोटोग्राफर युवकाने अल्पवयीन मुलीचे नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी गुरूवारी (दि. २३) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी महेश गोवर्धन कराळे (वय २३, रा. आगडगाव ता. नगर, हल्ली रा. नालेगाव, दिल्ली गेट) याच्या विरोधात विनयभंग, अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुलगी १४ डिसेंबर २०२२ रोजी केडगाव येथे मावस भावाच्या लग्नासाठी गेली असता तेथे फोटोग्राफीसाठी आलेल्या महेश कराळे सोबत तिची तोंड ओळख झाली होती. महेशने तिला इंन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने मुलीचा विश्‍वास संपादन करून मैत्री केली.

लग्न करण्याचे आमिष दाखवून ऑगस्ट २०२३ मध्ये त्याने तिला तो राहत असलेल्या नालेगाव येथील भाडोत्री रूमवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले. घरच्यांना काही सांगितले तर सदरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतरही महेश याने पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला.

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी बायपास येथील पुलावर पीडित मुलगी व महेश यांना पीडितेच्या मामाने पाहिले. तेव्हा पीडितेने तिच्या सोबत झालेला सर्व प्रकार मामाला सांगितला.त्यानंतर पीडितेने गुरूवारी (दि.२३) रात्री तोफखाना पोलीस ठाणे गाठून महेश गोवर्धन कराळे याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी कराळे विरोधात विनयभंग, अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles