पोलीस नाईक रवींद्र कर्डीले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
गफ्फार शेख यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी
अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथील गफ्फार वजीर शेख यांनी सायबर सेल तसेच स्थानिक गुन्हे शाखेशी संल्गन असलेले पोलीस नाईक रवींद्र कर्डीले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून माझा मुलगा असद शेख याने रवींद्र कर्डीले यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केल्याने कर्डीले याच्यावर कारवाई झाली त्याचा राग मनात ठेवत माझ्या मुलाच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कलम ३०७, १४७, १४८ , व १२० ब या गुन्ह्याशी काहीही संबंध नसताना असद शेख याला अटक केली, विनाकारण त्याला २ महिने जेलची शिक्षा भोगावी लागली, आता तो जामिनावर बाहेर आला असता तो बापूसाहेब दर्ग्याजवळ असताना रवींद्र कर्डीले यांच्या जवळचा मित्र जावेद जमीर शेख राहणार फकीरवाडा याने तेथे येऊन त्या ठिकाणी असलेल्या शाकीर आणि इतरांना बोलताना म्हणाला की, असद हा जामिनावर कसा सुटून आला आता त्याच्यावर ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे, असे सांगत आहे असद शेख याने रवींद्र कर्डीले यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याच्यावर जावेद हा खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी इतरांना सांगत आहे, तसेच यापूर्वी ९ मार्च २०२३ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन सांगितले होते की, पोलीस नाईक रवींद्र कर्डीले यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे तसेच माझ्यावर खेटे गुन्हे दाखल होण्याबाबत निवेदन दिले होते, तरी आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे. आणि कर्डिलेची चौकशी करून कारवाई करावी, तसेच मला व माझ्या कुटुंबियांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला पोलीस नाईक रवींद्र कर्डीलेला जबाबदार धरावे, अशी मागणी गफ्फार शेख यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी केली