ब्राम्हणी, ता. राहुरी येथील अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणारा फरार आरोपी 24 तासाचे आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, अल्पवयीन पिडीत फिर्यादी हिस आरोपी नामे रोजाउद्दीन शाई हल्ली रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, मुळ रा. मोतीराजपुर, राज्य बिहार याने तु इथे पळुन आली असुन मी तुला रहायला जागा दिली आहे असे म्हणुन वेळोवेळी जबरीने संभोग केला आहे व आरोपींची पत्नी फरीदा शाई हिने कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिले बाबत राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 30/2024 भादविक 376 (2), (एन), 323, 504, 506 सह बा.लै.अ.प्र.का.क. 4, 6, 8, 12 व अजाज (अ.प्र.) का. क. 3 (2), व्ही, 3 (1) प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोहेकॉ/ गणेश भिंगारदे, संतोष लोढे, देवेंद्र शेलार, पोना/फुरकान शेख, पोकॉ/अमृत आढाव, प्रशांत राठोड व चापोकॉ/अरुण मोरे अशांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन मिळुन आल्यास तात्काळ ताब्यात घेणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेताना आरोपी हा अहमदनगर शहरात येथे असल्याचे निष्पन्न झाले त्या अधारे आरोपींचा अहमदनगर शहरात शोध घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे रोजाउद्दीन शाई हा पाथर्डी बस स्टॅण्ड परिसरात असुन कोठे तरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथकास पाथर्डी येथे रवाना केले. पथकाने लागलीच पाथर्डी बसस्थानक येथे जावुन बातमीतील वर्णना प्रमाणे इसमाचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) रोजाउद्दीन ऊर्फ दाहरु अलिहुसेन ऊर्फ घुईल शाई वय 40, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी मुळ रा. अहुरा ता. छपराह, राज्य बिहार असे असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व डॉ. श्री. बसवराज शिवपुजे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.