अहमदनगर: मार्केटयार्ड परिसरात पार्किंगमध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धेचा काठीने झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. बाळू विठोबा नागपुरे (वय ६०, हल्ली रा. मार्केट यार्ड पार्किंग, मूळ रा. भिंगार) असे मृताचे नाव आहे.
या प्रकरणी मृताची बहीण कुसुम हरिभाऊ कुंभारे (६५, हल्ली रा. मार्केटयार्ड पार्किंग, मूळ रा. भिंगार) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस
ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणीपोलिसांनी फिर्यादीच्या जबाबावरून दुकाने मालक व इतर दोन अनोळखी अशा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला
आहे. काठीने केली मारहाण, भावाचा मृत्यू बहिण जखमी मार्केटयार्ड परिसरात फिर्यादी व त्यांचा मृत भाऊ पार्किंगमध्ये राहत होते. तेथे बसलेले असताना शेजारील दुकानदार व दोन अनोळखी व्यक्ती यांनी वृद्धाला इथे राहयाचे नाही, इथून निघून जा म्हणत काठीने मारहाण केली. यामध्ये महिला व तिचा भाऊ जखमी झाले. मात्र, नागपुरे यांचा मृत्यू झाला.