Saturday, May 18, 2024

चावी बनवायला घरी आला अन् दागिने घेऊन रोकड घेऊन पळालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात , नगर शहरातील घटना

अहमदनगर शहरात घरफोडी करणारा परराज्यातील आरोपीस 48 तासाचे आत जेरबंद करुन त्याच्याकडुन 3,70,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची गुजरात राज्यात जावुन कारवाई

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 04/04/2024 रोजी 12-00 ते 12-30 वा चे दरम्यान अहमदनगर शहरातील फिर्यादी नामे किशोर होरीलाल कत्रोड, वय 55 वर्षे, रा.इदिरा कॉलनी तारखपुर यांना त्यांचे दुकानासमोर अदांजे 30 ते 35 वयोगटातील चावी बनवणारा पगडी घातलेला इसम याने मी विविध चाव्या बनवुन देतो असे सांगितल्याने फिर्यादीने त्याच्याकडुन स्प्लेंडर बनवुन घेतली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यास घरातील कपाटाची चावी बनविण्याबाबत सांगितले. कपाटाची चावी बनवत असतांना सदर इसमाने कपाटाची चावी बनत नाही मी काही आवश्यक सामान घेवुन येतो असे सांगुन गेला तो पुन्हा आला नाही. कपाटाची चावी बनवत असतांना वरील चावी बनवणारा पगडी घातलेला इसम याने फिर्यादीचे कपाटातील 3,70,000/- रुपयाचे दागीने व रोख रक्कम चोरी केली होती. सदर घटनेवरुन तोफखाना पोलीस ठाणे गुरनं 439/2024 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ/संदिप पवार, दत्तात्रय हिंगडे, पोना/रविंद्र कर्डिले, फुरकान शेख, पोकॉ/विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, अमृत आढाव अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थागुशा चे वरील पथक सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा इसम नामे जगदीश सिंग शिखलीकर रा.सुरत, राज्य गुजरात याने केला असुन तो सध्या त्याचे राहते घरी सुरत, राज्य गुजरात येथे आहे. अशी माहिती मिळाल्याने वरीष्ठांचे पुर्व परवाणगीने आरोपीचा शोध घेणेकामी सदर पथक सुरत, राज्य गुजरात येथे रवाना झाले. पथकाने संशयीत आरोपी जगदीश सिंग शिखलीकर याचा सुरत राज्य गुजरात येथे जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव जगदीशसिंग विक्रमसिंग शिखलीकर, वय 32 रा.अंब्रोली, योगीकृपा सोसायटी मकान नं.49, सुरत, राज्य गुजरात असे असल्याचे सांगितले. त्यास गुन्ह्याबाबत विचारपुस करता प्रथम त्याने उडवाउडविचे उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने मागील दोन दिवसापुर्वी जिल्हा अहमदनगर राज्य महाराष्ट्र येथे जावुन अहमदनगर शहरातील इंदिर कॉलनी येथे एका घरातुन सोन्याचे चोरी केल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडुन एकुण 3,70,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 53.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम हस्तगत करुन जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 439/2024 भादवि कलम 380 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles