घरफोडीचे गुन्ह्यातील सराईत 2 आरोपी जेरबंद,
चोरीचे सोने घेणारा ज्योर्तीलिंग ज्वेलर्सचा मालक सह आरोपी
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 19/10/23 रोजी फिर्यादी श्री. मोहनीराज आनंदा जाधव वय 37, रा. मुकींदापुर, ता. नेवासा हे पत्नीसह घर बंद करुन शेतात गेले होते. त्यांचे घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेले 60,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले बाबत नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 1012/2023 भादविक 454, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुण अहमदनगर जिल्ह्यातील ना उघड गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, भिमराज खर्से, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
स्थागुशा पथक नेवासा परिसरात फिरुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करताना पथकास आरोपी नामे आकाश छगन काळे रा. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने त्याचे साथीदारासह केला असुन ते गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी प्रवरासंगम, ता. नेवासा येथे बस स्टॅण्ड येथे उभे असुन ते गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच प्रवरासंगम, ता. नेवासा येथील बस स्टॅण्ड येथे जावुन बातमीतील वर्णना प्रमाणे 2 संशयीत इसम उभे असलेले पथकास दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) आकाश ऊर्फ ताकसाहेब छगन काळे वय 22, रा. आंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व 2) कुनत्या बंडु भोसले वय 25, रा. बाबरगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता आकाश छगन काळे याचे अंगझडतीमध्ये 28,000/- रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले आहेत. पथकाने सदर दागिन्याबाबत विचारपुस करता संशयीतांनी सोन्याचे दागिने हे त्यांचे इतर साथीदार नामे 3) अभिष छगन काळे (फरार) व 4) गुंड्या डिचार्ज काळे (फरार) दोन्ही रा. आंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशांनी मिळुन 5-6 महिन्यांपुर्वी नेवासा फाटा परिसरात दिवसा घरफोडी करुन तेथुन चोरुन आणलेले असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी करता आरोपींनी नेवासा फाटा, ता. नेवासा, कारेगांव, ता. श्रीरामपूर व घारगांव, ता. संगमनेर येथे घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे 03 गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. नेवासा 1012/23 भादविक 454, 380
2. श्रीरामपूर तालुका 655/23 भादविक 454, 380
3. घारगांव 554/23 भादविक 454, 380
ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यातील उर्वरीत सोन्याचे दागिन्याबाबत विचारपुस करता आरोपींनी उर्वरीत सोने हे गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ज्योर्तीलिंग ज्वेलर्स दुकानाचे मालक आनंदराव निवृत्ती पाटील यांना विकल्याचे सांगितल्याने आनंदराव निवृत्ती पाटील यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा.श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आ