खबरदार उडणपुलाच्या पिलर वर जाहिरात कराल तर होणार गुन्हा दाखल

0
908

पोस्टर लावल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर प्रतिनिधी – नगर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उड्डाण पूलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे या उड्डाणपुलाच्या कामामुळे शहराच्या सौंदर्यकरणात भर पडणार आहे खासदार सुजय विखे पाटील व शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून उड्डाणपुलांच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र रेखाटनेचे काम सुरू झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीला कायमस्वरूपी प्रेरीत राहावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे एका महाशयाने चक्क उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेखाटलेल्या चित्राखाली जाहिरातीचा पोस्टर लावण्याचे धाडस केले मात्र उड्डाणपूल प्रशासनाने तात्काळ या महाशयावर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम केले आहे कोणी जर उड्डाणपुलाच्या पिलरचे विद्रोपीकरण करण्याचे काम केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील असा इशारा उड्डाणपूल प्रशासनाने दिला आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कलम 427 प्रमाणे फिर्यादी राहुल विठ्ठल यांनी फिर्याद दाखल केली आहे अज्ञात आरोपीने उड्डाणपुलाची रंगोरंगोटी केलेल्या पिलर नंबर 64 वर सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल वक्रतुंड मार्केट जवळ नगर पुणे रोड केडगाव अहमदनगर यांच्या जाहिरातीचे छोटे बॅनर चिटकवून सदर कलरच्या रंगरंगोटीच्या कामाचे नुकसान केले आहे म्हणून सदर अज्ञात व्यक्तीवर कलम 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.