Saturday, May 18, 2024

कागदपत्रांची हेराफेरी करून बॅंकेकडून लाखोंचे कर्ज, नगरमध्ये २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल….

नगर : स्वयंसेवी संस्थांच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून, त्याआधारे बँकेकडून ८५ लाख रुपयांचे कर्ज परस्पर मंजूर करून घेण्यात आले. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी डॉ. राकेश कांतिलाल गांधी (रा. महादेव अपार्टमेंट, पाइपलाइन रस्ता, सावेडी) व डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर, नगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अमित रसिकलाल कोठारी (रा. माणिकनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी नमूद केले, की सेवाभावी रेंज फाउंडेशन सोसायटी आणि बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठान, आखेगाव (ता. शेवगाव) या दोन्ही स्वयंसेवी संस्था आहेत. साई एंजल स्कूल हे बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठानामार्फत संचलित केले जाते. डॉ. राकेश गांधी आणि डॉ. आशिष भंडारी यांनी ९ ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान दोन्ही संस्थांच्या अटी-शर्तीमध्ये परस्पर बदल केले. एचडीएफसी बँकेच्या स्टेशन रस्ता शाखेत ८५ लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव साई एंजल स्कूलच्या दोन मजले इमारतीच्या बांधकामासाठी सादर केला.

रेंज फाउंडेशनच्या सदस्य श्वेता अमित कोठारी आणि रसिक चंदूलाल कोठारी (मयत) यांची पूर्वपरवानगी न घेता, कोणताही ठराव न करता रेंज फाउंडेशनला जामीनदार करून घेतले. रेंज फाउंडेशनच्या कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून ती कागदपत्रे खरी आहेत, असे भासवून बँकेच्या कर्ज प्रस्तावात सादर केले. फाउंडेशनच्या विश्वस्तांचा कोणताही ठराव न करता डॉ. राकेश गांधी आणि डॉ. आशिष भंडारी यांनी स्वत:कडे फाउंडेशनचे अधिकार करून घेतले. त्यामुळे श्वेता कोठारी, रसिक कोठारी (मयत) व आपला विश्वासघात करून फसवणूक केली. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी विश्वासघात, फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल मुंगडे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles