Monday, April 22, 2024

नगरमध्ये लष्करातील जवानाकडून ऑन ड्युटी पोलिसाला मारहाण….

नगर : पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून दामोदर सानप (रा. सैनिकनगर, भिंगार) याला कॅम्प पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यासंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे वाहनचालक एस. एन. काळे यांनी फिर्याद दिली आहे. दामोदर सानप हा लष्करी जवान असून, श्रीनगरमध्ये (काश्मीर) नियुक्त आहे.

दामोदर सानप दारू पिऊन त्रास देत असल्याची तक्रार घेऊन त्याचे सासरे व मेव्हणा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात काल, शनिवारी सायंकाळी आले होते. पोलिसांनी सानप याला पोलीस ठाण्यात बोलावून आणण्यासाठी चालक काळे यांना वाहन घेऊन पाठवले. परंतु सानप याने काळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सानपविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles