फिर्यादी श्री. प्रशांत पुरुषोत्तम शर्मा वय 35, श्रीकृष्ण नगर, एकविरा चौक, अहमदनगर हे दिनांक 14/01/24 रोजी त्यांची पत्नीसह मोटार सायकलवर रस्त्याने जाताना काळे रंगाचे जर्किन व डोक्यात टोपी घातलेले अनोळखी 2 इसम काळे रंगाचे विना नंबर पल्सर मोटार सायकलवर येवुन फिर्यादी यांचे पत्नीचे गळ्यातील 52,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन घेवुन गेले बाबत तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 61/2024 भादविक 392, 34 प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
अहमदनगर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधा करीता पथक नेमुण जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 21/01/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पोना/ संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक अहमदनगर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी नामे गणेश आव्हाड, रा. नागापुर व सागर नागपुरे रा. सावतानगर भिंगार यांचेवर संशय बळावल्याने त्यांचा शोध घेत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत दोन्ही आरोपी काळे रंगाचे विना नंबर पल्सर मोटार सायकलवर भिस्तबाग परिसरात फिरत आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने लागलीच भिस्तबाग येथे जावुन, सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे दोन्ही संशयीत आरोपी काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करुन थांबविले. संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) गणेश विठ्ठल आव्हाड वय 24, रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, अहमदनगर व 2) सागर रमेश नागपुरे वय 30 रा. सावतानगर, भिंगार अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात सोन्याचे दागिने व 1 काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल मिळुन आल्याने त्याबाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर व लोणी परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने आसल्याची माहिती दिली. त्यावरुन अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे 12 गुन्हे उघडकिस आले आहेत.