Tuesday, February 18, 2025

शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला शेतमालही असुरक्षित….नगरमध्ये 6 चोरटे गजाआड

शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त दि.28/12/2023 रोजी रात्री 01/00 वा.चे सुमा. कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतक-याने अंगणात जमा करुन ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. त्यावरुन ऋषिकेश देविदार लगड रा.कोळगाव ता.श्रीगोंदा यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे । गुरनं.692/2023 भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा श्री. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथिल दि.31/12/2023 रोजी जामगाव ता.पारनेर येथिल आरोपी नामे संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने शेत मालाची चोरी केली आहे. त्याप्रमाणे पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड, विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर 96,000/- रु. जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000/- रुपये कि.चा पांढरे रंगाचा टाटा इंट्रा व्ही 30 गाडी नं.एम एच 16 सीडी व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000/- रुपये कि.चे असा एकुण 9,26,000/- रु. किमतीचा मुद्देमाल वरिल आरोपीकडुन जप्त करण्यात आलेला आहे. स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सो, मा. प्रशांत खैरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री विवेकानंद वाखारे साहेब ,पोलीस निरीक्षक मा श्री दिनेश आहेर, (स्थागुशा), यांच्या मार्गदर्शनात
पथक क्रम -1) स.फौ.दत्तात्रय हिंगडे(स्थागुशा), पोकाँ रणजित जाधव, पोकाँ भाऊसाहेब काळे, पोकाँ अमोल कोतकर, पोकाँ ससाने, पोकाँ कोल्हे, चालक पोकाँ अरुण मोरे यांचे पथकाने केली.
पथक क्रमांक – 2)पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles