ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच चोर निघाला..
दागिने चोरणाऱ्या ड्रायव्हरला कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद
कोतवाली पोलिसांची कामगिरी : सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
अहमदनगर ::: पुणे येथे एका समारंभाला वाहनावर एका दिवसासाठी आलेल्या बदली वाहन चालकाने महिलेच्या दागिन्याची चोरी केली होती. कोतवाली पोलिसांनी चोरी करणाऱ्या वाहन चालकाला अटक केली असून, तीन लाख २५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. समिर नामदेव शेळके (रा. बालिका आश्रम रोड, अहमदनगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भरत गोपाळदास देवी (रा.खिस्तगल्ली, अहमदनगर) यांनी दिनांक १४ ऑक्टोंबर २०२३ रोजी पुणे येथे एका समारंभासाठी गेले होते. त्यांनी कार चालविण्यासाठी एक हजार रुपये देऊन एक वाहनचालक सोबत नेला होता. फिर्यादी यांच्या पत्नीने सोन्याचे दागीने कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा अल्टो गाडीच्या डिक्कीत ठेवले होते. ते नंतर मिळून आले नाही. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या. सोबत नेलेल्या वाहन चालकाने दागिन्यांची चोरी केली असू शकते असा संशय तक्रारदाराला आणि पोलिसांना होता. कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक करून ४ सोन्याच्या बांगड्या, दोन कानातील सोन्याचे झुंबे असा तीन लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ गणेश धोत्रे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर
यादव, पोहेकाँ तनविर शेख , पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सलिम शेख, पोना एपी इनामदार, पोकाँ अमोल गाढे, पोकॉ संदिप थोरात, पोकॉ अभय कदम, पोकाँ सोमनाथ राउत, पोकॉ अतुल काजळे, पोकॉ कैलास शिरसाठ , पोकाँ सुजय हिवाळे, पोकाँ महेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.