Wednesday, April 17, 2024

जिल्ह्यात अवैध दारु विरुध्द कारवाई, 11,37,961/- रुपये किंमतीचा मुद्देमाल, 100 आरोपी ताब्यात

अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारु विरुध्द कारवाई,
11,37,961/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 100 आरोपी ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
————————————————————————————————————-
आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे व वाहतुक करणा-या इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दिनांक 30/03/2024 ते दिनांक 02/04/2024 या कालावधीमध्ये एकुण 95 गुन्हे दाखल करुन 100 आरोपींचे ताब्यातुन 11,37,961/- रुपये किमतीची देशी विदेशी व गावठी हातभट्टीची दारु व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार आहे.

पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विक्री करणारे इसमांविरुध्द करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे
अ.नं. पोलीस स्टेशन दाखल गुन्हे जप्त मुद्देमाल आरोपी
1 पारनेर 06 14925 06
2 पाथर्डी 08 31095 08
3 राहुरी 04 28015 04
4 शेवगांव 13 56000 14
5 घारगांव 03 17870 03
6 लोणी 02 3430 02
7 मिरजगांव 02 8640 02
8 शिर्डी 02 4200 02
9 नेवासा 04 6230 04
10 नगर तालुका 11 147141 12
11 आश्वी 05 22450 05
12 जामखेड 08 129960 08
13 सोनई 04 51910 04
14 संगमनेर तालुका 04 7910 05
15 श्रीरामपुर शहर 06 26680 07
16 कर्जत 10 558220 11
17 कोतवाली 02 19925 02
18 तोफखाना 01 3360 01
एकुण 95 1137961 100

सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा.श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा.श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles