Friday, May 3, 2024

गावठी कट्टा बाळगणारा नगर तालुक्यातील कोकाटे जेरबंद, जिवंत काडतुसे जप्त

गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई
—————————————————————————————————————-
आगामी लोकसभा निवडणुक सन 2024 चे अनुषंगाने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, संतोष खैरे, रणजित जाधव यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
वरील पोलीस पथक दिनांक 20/04/2024 रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे सुरेश दत्तात्रय कोकाटे रा. तळेवाडी, चिचोंडी पाटील, ता. जि. अहमदनगर हा विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) त्याचे कब्जात बाळगुन असुन तो आत्ता त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने चिचोंडी पाटील गावामध्ये जावुन बातमीतील नमुद इसमाचे घरी जावुन खात्री करता सदर घरासमोर एक इसम मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव सुरेश दत्तात्रय कोकाटे वय 21 वर्षे, रा. तळेवाडी, चिचोंडी पाटील, ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची अंगझडती घेता त्याचे डावे कमरेस खोचलेले 30,000/- रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व पिस्टलचे मॅग्झिनमध्ये 2000/- रुपये किमतीचे 02 जिवंत काडतुसे असा एकुण 32,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द पोकॉ/2514 रणजित पोपट जाधव नेम – स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 412/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री संपतराव भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles