अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळुन नेणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलीसांकडुन अटक.
दिनांक २६/०९/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं १०६३/२०२४ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असुन अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली की, दिनांक २६/९/२०२४ रोजी सकाळी ११/०० मी व माझी अल्पवयीन मुलगी असे भिमवाडी रेल्वे स्टेशन अहमदनगर माझे रहाते घरातुन माझे रिक्षात माझी मुलीला सोबत घेवुन प्रेमराज गुगळे हायस्कुल माळीवाडा, येथे शाळेच्या गेटवर सोडुन मी रिक्षा चालवून माझी उपजिवीका करीत असल्याने मी माझी रिक्षा घेवुन नगर शहरात रिक्षा स्टॉपवर गेलो असता दुपारी १/०० वा. चे सुमारास माझी पत्नी हीने फोन वरुन कळविले की, शाळेतुन फोन आला आहे. आपली मुलगी ही शाळेत आलेली नाही तेव्हा मी लगेच शाळेत जावुन माझी मुलगी बाबत शाळेतील स्टाफ ला विचारपुस करता मला समजले की, माझी मुलगी ही शाळेत नाही. तेंव्हा मी लगेच शाळेच्या आसपासच्या परिसरात तसेच आमचे रहाते घराचे आसपासचे परिसरात मुलीचा शोध घेतला असता मुलगी मिळुन आली नाही. तसेच नातेवाईक व मित्र परीवार यांचे कडे चौकशी केली असता मुलगी मिळुन आली नाही. व ती घरी परत आली नाही. त्यामुळे माझे अल्पवयीन मुलीस माळीवाडा, अहमदनगर येथुन अज्ञात इसमाने अज्ञात कारणा करीता, अज्ञात ठिकाणी बळजबरीने घेवुन गेला आहे. वैगेरे मजकुराची फिर्याद दाखल झाल्याने पो.नि. श्री दराडे सो यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हेशोध पथकास सदर गुन्हयाबाबत माहिती देवुन आरोपी व अपहरीत मुलीचा शोध
घेण्याबाबत सुचना देवुन पथक रवाना केले. सदर गुन्हयाचा तपास हा तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या माहिती वरुन बातमी मिळाली की सदरची अपहरीत मुलगी व तीस घेवुन जाणार ईसम हा राहुरी बस स्थानक येथे आहे या बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकातील अमलदार यांनी लगलीच राहुरी बस स्थानक येथे जावुन अपहरीत अल्पवयीन मुलीचा काही तासातच शोध घेवुन तिला घेवुन जात असलेला आरोपी नामे ओम गोपी झेंडे ऊर्फ ओमकार गायकवाड वय १९ वर्ष रा. अचानक चाळ रेल्वे स्टेशन अहमदनगर यास व अल्पवयीन अपहरीत मुलीस राहुरी बस स्थानक येथुन ताब्यात घेवुन सदर मुलीची सुटका केली व त्यानंतर आरोपी व अपहरीत मुलगी यांना ताब्यात घेवुन पुढील तपास करीता कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवुन येऊन आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई. कैलास कपिले हे करत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल भारती सो यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, म.स.पो.नि योगिता कोकाटे, पो.स.ई. कैलास कपिले गुन्हे शोध पथकाचे म.पो.हे. कॉ रोहिणी दरंदले पो.हे.कॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सुर्यकांत डाके, पो.कॉ अमोल गाढे, अभय कदम, कुणाल खरात ,सतीश शिंदे, अतुल काजळे, व दक्षिण मोबाईल सेल चे पो.कॉ राहुल गुंडू यांनी केले आहे.